औरंगाबाद :- जिल्ह्यात आज १५५जणांना (मनपा १२४, ग्रामीण ३१) सुटी देण्यात आली. आजपर्यंत ११६७६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण २८३ कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५७७४ झाली आहे. आजपर्यंत एकूण ५०९ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ३५८९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर २०७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ४५ , मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५५ आणि ग्रामीण भागात ९५ रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
सिटी एंट्री पॉइंट (४५)
नक्षत्रवाडी (१), एकनाथ नगर (१), पडेगाव (१), उस्मानपुरा (१), वाळूज एमआयडीसी (१), कोकणवाडी (१), प्रकाश नगर (१), राम नगर (२), चिकलठाणा (१), कुंभेफळ (१), गणोरी (१), राजे संभाजी नगर (१), शेंदूरनी (२), नारेगाव (१), रोजेबाग (१), जाधववाडी (2), अरिहंत नगर (१), शिवना (२), एन सात (१), हर्सूल (2), एन बारा (१), मातोरा (१), चितेगाव (२), नक्षत्रवाडी (२), गंगापूर (१), इटखेडा (१), केसापुरी (१), गणेश कॉलनी (१), ढोरकिन (१), वळदगाव (१), बालाजी नगर (१), सिडको महानगर (१), द्वारका नगर (२), गारखेडा (१), जय भवानी नगर (१), पडेगाव (१), मिटमिटा (१)
मनपा हद्दीतील रुग्ण (११)
संघर्ष नगर (१), घाटी परिसर (२), आलमगीर कॉलनी (१), अन्य (२), बालाजी नगर (१), सिडको एन अकरा (४)
ग्रामीण भागातील रुग्ण (१)
शास्त्री नगर, सिल्लोड (१),
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शहरातील खासगी रुग्णालयात गारखेडा परिसरातील ७३, सिडकोतील विश्वकर्मा कॉलनीतील ५२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.