Saturday, May 4, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य : कविता: खडान, ढगूळण्या - माधव गावित

जनभूमी साहित्य : कविता: खडान, ढगूळण्या – माधव गावित

खडान

कोकला चहडत्याय

खेकडा नदवत्याय

मुरवा पटपट

धावत्याय…

झरील पोश्या हेरत्याय

गांडोळावर नेम धरत्याय

कोरडे वहळावर तसीच

ईसासत्याय…

खेकडाल गरी बनवत्याय

गुंतूणालं गरी बनवत्याय

डोण्यावर मुरवा

उडवत्याय…

दाहडाल आटवत्याय

खडानाला नदवत्याय

फाखऱ्यावर मुरवा

ठवत्याय…

पाण्यात दगड टाकत्याय

दगडावर चहडून बसत्याय

गरील गटगट नदवत्याय

एक एक मुरवा

दवाडत्याय…

  माधव ह. गावित –

  9657557198 –

ढगूळण्या

वरस ढगूळण्या तरी

एकदाचा लाऊं दे भारी

आंगरी शेतात हेरू दे तरी…

वरस ढगूळण्या तरी

झोळीभर पिकू दे भारी

खूटवली भरू दे तरी…

वरस ढगूळण्या तरी

भरूदे शेताची सरी

घेऊदे पिक भारी…

वरस ढगूळण्या तरी

चहडूदे आंगरवर भारी

नटूदे नांगली सारी…

वरस ढगूळण्या तरी

घेऊदे मेंडावर न्याहरी

चहडूंदे सरीवर सरी…

वरस ढगूळण्या तरी

खेळूंदे सेहल्या भारी

नटूंदे चिखलात सारी…

वरस ढगूळण्या तरी

लाऊंदे एकदा तरी

पाहूंदे शेत भारी…

माधव ह.गावित

9657557198

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय