जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागणीला २४ तासाच्या रिपोर्टनुसार १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वेगाने होत असल्याचे दिसून येते.
मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार शिंदेवाडी ७, डिंगोरे ७, पिंपळवंडी ७, खडकुंबे ६, ओतूर ६, कुमशेत ६, चिंचोली ६, बारव ५, नारायणगाव ५, कोळवाडी ४, आळे ३, संतवाडी ३, आळेफाटा ३, आपटाळे ३, बेल्हे ३, इंगळून ३, राळेगण ३, खिरेश्वर ३, राजूरी ३, उदापूर ३, आगार ३, गुंजाळवाडी आर्वी ३, सावरगांव ३, बुचकेवाडी ३, वडगांव आनंद २, गोद्रे २, खामगाव २, राजूर २, आंबोली २, हिवरे तर्फे मिन्हेर २, भोईरवाडी २, कोपरे २, वारूळवाडी २, पाचघर २, रोहकडी २, खामंडी २, उब्रंज २, बोरी बु २, शिरोली बु २, हडसर १, पुर कुकडेश्वर १, सोमतवाडी १, सुराळे १, आणे १, पेमदरा १, बांगरवाडी १, तांबे १, केवाडी १, निमगिरी १, हिवरे तर्फे खोडद १, डुंबरवाडी १, नेतवड १, चाळकवाडी १, भटकळवाडी १, नगदवाडी १, कुरण १, गोळेगाव १, पिंपळगाव आर्वी १, निमगाव तर्फे म्हाळुंगे १, वडगांव साहनी १, काले १, कुसूर १, पारुंडे १, जुन्नर नगर परिषद १४ यांचा समावेश आहे.
तर तालुक्यातील ७ पुरुष व ४ स्रियांचा कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस मृत्यूदरात वाढ होताना दिसत आहे.