Saturday, May 11, 2024
Homeआरोग्यकोरोनाबीड जिल्ह्यात आज १३ कोरोना पॉझिटिव्ह, काळजी घ्या!

बीड जिल्ह्यात आज १३ कोरोना पॉझिटिव्ह, काळजी घ्या!

बीड(प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज पुन्हा १३ रुग्णाची भर पडली आहे. आष्टीतील  देवीलिमगाव या ठिकाणी २ रुग्ण सापडले असून त्यात ४ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षीय मुलगीचा समावेश आहे.

तसेच, बीड शहरात ३ कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यात ६३ वर्षीय पुरुष असून तो उमर मस्जिदजवळ राहणारा आहे, तसेच  ७८ वर्षीय पुरुष असून थिगळे गल्लीजवळ स्थानिक आहे, तर तिसरा ६० वर्षीय स्त्री असून पांडे गल्लीत राहणारी आहे.

परळी शहरात ५ कोरोना बाधित आढळून आले असून त्यातील ३ पुरुष असून २ स्त्रियांचा समावेश आहे, त्या एसबीआय बँक परळी येथील कर्मचाऱ्याचे कुटुंबीय असल्याचे सांगितले जाते आहे.

अंबाजोगाई येथे ३ रुग्ण सापडले असून ३८ वर्षीय सिराज कॉलोनीतील असून ते अलिबाग येथून आलेला होते, २२ वर्षीय पुरुष केकानवाड़ी रहिवासी असून किर्गिस्थान येथून आलेला होते, तर ३० वर्षीय पुरुष सातपुते गल्लीतील रहिवासी असून पुणे येथून आलेला होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय