कोल्हापूर : संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान तर्फे कोवीड योद्धा पुरस्कार वितरण सोहळा दिलीपराव माने सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला नगरसेवक वैभव माने यांची प्रमुख उपस्थित होते.
संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे, उपाध्यक्ष शिवराम बुध्याळकर तसेच सचिव स्वप्निल चोपडे या उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कबीर नाईकवारे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात ‘संविधानातील मुलभूत हक्क आणि अधिकार’ याविषयी मांडणी केली. या कार्यक्रमात आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलिस, वाहतुक पोलिस, पत्रकार यांना सन्मानित करण्यात आले.