Salman Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमानला धमकावल्याच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली असून, त्याच्या घराबरोबरच शूटिंगच्या सेटवरही कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शार्प शूटर सुक्खाने पोलीस चौकशीदरम्यान कबूल केले आहे की, तो सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा कट रचत होता. या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
हरियाणाच्या पानीपत येथून शार्प शूटर सुक्खाला अटक करण्यात आली आहे.सुक्खाने आपली ओळख लपवण्यासाठी दाढी वाढवली होती, परंतु पोलिसांनी त्याला हॉटेलमधून पकडले. अटक करताना सुक्खा नशेत असल्याचेही समोर आले आहे. त्याला अटक केल्यावर समोर आले की, तो सलमानच्या फार्महाऊसची तपासणी करून तिथल्या गार्डसोबत मैत्री करून फार्महाऊसवर सलमान खानला मारण्याचा कट रचत होता.
नवी मुंबई पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी एकत्रित कारवाई करून सुक्खाला हॉटेलमधून अटक केली. अटकेच्या वेळी तो नशेत होता, त्यामुळे त्याला शुद्ध नव्हती. तपासादरम्यान, सुक्खाने सलमान खानला मारण्याची संपूर्ण योजना उघड केली.
या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा मोठा हात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 10 आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर सलमान खानला पोलिसांकडून अधिक सुरक्षा पुरवण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वीही सलमानच्या घरावर गोळीबार झाला होता, त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमक्यांमुळे या प्रकरणाला आणखी गंभीरता प्राप्त झाली आहे.
Salman Khan
हेही वाचा :
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, दहावीच्या परीक्षेत मोठा बदल
पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्थानकाला भीषण आग
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडण्याचा निर्णय; माजी मंत्र्याचे खळबळजनक विधान
सलमान खानला पुन्हा धमकी? केली ‘इतक्या’ कोटींची मागणी
देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल
पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती