Friday, November 22, 2024
Homeराष्ट्रीयClaudburst : हिमाचल मध्ये ढगफुटी, 3 मृत्यू 50 बेपत्ता, पांढोह धरणातून ...

Claudburst : हिमाचल मध्ये ढगफुटी, 3 मृत्यू 50 बेपत्ता, पांढोह धरणातून विसर्ग (video)

मंडी : हिमाचल प्रदेशातील मंडी येथील पांढोह धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे आसपासच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. (Claudburst)

याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. कुल्लू-मनाली परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि मेघफुटामुळे बियास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अधिक पूर येण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाने धरणाचे दरवाजे उघडले. (Claudburst)


गुरुवारी सकाळी झालेल्या ढगफुटी मुळे रामपूर, शिमला येथील समेज खड आणि मंडीच्या पधार उपविभागातील थलटुखोड या ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे.आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि सुमारे 50 जण बेपत्ता असल्याचे समजते.

राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांच्या बचाव पथकांना प्रभावित लोकांना शोधण्यासाठी आणि मदतकार्य करण्यासाठी तैनात केले आहे.

शिमला येथील उपयुक्त अनुपम कश्यप यांनी समेज खड येथे बचाव कार्यासाठी SDRF पथक पाठविण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच कुल्लू, मनाली, शिमला सह आसपासच्या परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. (Claudburst)

पांडोह धरण हे हिमाचल प्रदेश , भारतातील मंडी जिल्ह्यातील बियास नदीवरील बांधलेले धरण आहे. बियास प्रकल्पांतर्गत, धरण 1977 मध्ये पूर्ण झाले आणि त्याचा प्राथमिक उद्देश जलविद्युत निर्मिती आहे.

रन-ऑफ-द-रिव्हर पॉवर योजनेचा भाग, ते बोगदे आणि वाहिन्यांच्या 38 किमी (24 मैल) लांबीच्या प्रणालीद्वारे बियासचे पाणी नैऋत्येकडे वळवले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

संबंधित लेख

लोकप्रिय