Saturday, May 4, 2024
Homeजुन्नरपुणे : जुन्नर तालुका अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न

पुणे : जुन्नर तालुका अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न

डिझिटल नावाखाली अंगणवाडीचे खाजगीकारण करण्याचा केंद्र सरकारचा डाव – शुभा शमीम

ओतूर : अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा (CITU) जुन्नर तालुका मेळावा आज (दि.9) चैतन्य गार्डन ओतूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मेळाव्याच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचे हस्ते क्रांती ज्याती सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेआ अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्षा शुभांगी शेटे होत्या. तर संघटनेच्या राज्य सचिव शुभा शमीम व जिल्हा सचिव रजनी पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य सचिव सुभा शमीम म्हणाल्या, “पोषण आहार टँकर हा अप्स मराठी असला पाहिजे, डिझिटल नावाखाली अंगणवाडीचे खाजगीकारण करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. अनेक अंगणवाडी डीबीटी सारखी योजना आणून पोषण आहार बंद करू शकते, त्यामुळे पहिले नुकसान म्हणजे मदतनीसांची नोकरी धोक्यात येईल आणि सेविकेचा फक्त ऑनलाइन कारकुनी करावी लागेल.”


जुन्नर : वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय चव्हाण यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

केंद्र व राज्य सरकारने वाढत्या महागाईनुसार अमृता आहार योजनेच्या निधीत वाढ करणे गरजेचे आहे. अंगणवाडी हा शैक्षणिक जीवनाचा पाया आहे, त्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासनाने अंगणवाडी केंद्र विकास कसा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सेविका व मदतनीस यांना चांगले मानधन कसे मिळेल यासाठी मोठया संख्येने एकजूट होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.

यावेळी बोलताना संघटनेचे तालुका समन्वयक लक्ष्मण जोशी म्हणाले, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रश्न गंभीर होत असताना तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी लाल झेंडाच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याची गरज आहे. अंगणवाडीचे प्रश्न सोडवण्यासाठी लाल झेंडाच्या नेतृत्वाखाली काम करणारी किसान सभा, कामगार संघटना या सर्वच संघटना तुमच्या सोबत असल्याचे प्रतिपादन जोशी यांनी केले.

जुन्नर : शरद पवार यांच्या निवासस्थानावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध !


संतापजनक ! भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून पत्रकारांना पोलिसांकडून नग्न करून मारहाण

तर जिल्हा सचिव रजनी पिसाळ म्हणाल्या, “आपली संघटना ही देश, राज्य, जिल्हा, तालुका या सर्व पातळीवर सर्वात मोठी संघटना आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले आणि ते सोडवाचे असतील तर संघटित झाल्या शिवाय पर्याय नाही, असेही त्या म्हणाल्या.

त्यानंतर राज्य शासनाचा आदर्श अंगणवाडी पुरस्कार प्राप्त मोमीन गल्ली, ओतूर च्या अंगणवाडी सेविका रेश्मा मोमीन व मदतनीस मिनाज मोमीन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नव्याने संघटनेत सामील झालेल्या मढ बीटच्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा देखील सत्कार करण्यात आला.

जुन्नर : किशोरवयात आपले आरोग्य सांभाळा – डॉ. प्रिया करडिले


कोरोना उद्रेक : ‘या’ देशात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, तर चुंबन आणि एकत्र झोपण्यावरही बंदी

यावेळी साधना मोजाड , रुक्मिणी लांडे, सुशिला तांबे, छाया ठिकेकर, जानकी शिंदे, लीला आबडेकर, छाया डोके, पाफाळे ताई, तुळाबाई घोडे यांनी आपल्या अडचणी मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव मनीषा भोर यांनी केले. यावेळी शहरी प्रकल्प कोंढवा घ्या शारदा सपकाळ, माधुरी मुरादे, सुप्रिया खरात, मीना मस्करे, कौशल्या बोऱ्हाडे आदींसह ओतूर बीट 1, 2, 3, मढ बीट, आपटाळे बीट 3 मधील अंगणवाडी व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय