Thursday, April 25, 2024
HomeNewsपाकिस्तानमध्ये राजकीय उलथापालथ, इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर

पाकिस्तानमध्ये राजकीय उलथापालथ, इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर

पाकिस्तान : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेले राजकीय संकट अखेर संपले आहे. रात्री उशीरा पाकिस्तानच्या संसदेमध्ये इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.

गेल्याच आठवड्यात इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष कासिम सूरी यांनी इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव फेटाळून लावला होता. न्यायालयाने कासिम सूरी यांचा निर्णय रद्दबातल ठरवल्यानंतर इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यावेळी इम्रान खान हे पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत आपले बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले आहेत. 

संतापजनक ! भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून पत्रकारांना पोलिसांकडून नग्न करून मारहाण

रात्री उशिरा या ठरावावर झालेल्या मतदानामध्ये १७४ संसद सदस्यांनी इम्रान खान यांच्याविरोधात ठरावाच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

हे असू शकतात नवे पंतप्रधान?

दरम्यान, इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावानंतर पाकिस्तानी संसदेतील विरोधी पक्षनेते शेहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 कोरोना उद्रेक : ‘या’ देशात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, तर चुंबन आणि एकत्र झोपण्यावरही बंदी

आयटीआय पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1625 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय