Tuesday, May 21, 2024
Homeबॉलिवूडसिनेविश्र्व : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची पहिली झलक पाहिलीत का ?

सिनेविश्र्व : ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा’ची पहिली झलक पाहिलीत का ?

दाक्षिणात्य अभिनेता एनटीआर त्याच्या आगामी अ‍ॅक्शन ड्रामा ‘देवरा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून त्याचा एक वेगळा अवतार पाहायला मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात जान्हवी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ अली खान देखील आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

देशभरातील चाहते आणि प्रेक्षक ‘देवरा’चं विश्व पाहण्यासाठी आतुरतेनं वाट पाहत होते. ‘देवरा’ या जगाची ओळख करून देणारी झलक आज प्रदर्शित झाली आहे. या व्हिडिओत समुद्र, जहाजे आणि रक्तपाताने भरलेल्या जगाची ओळख करून देण्यात आली आहे. NTR एका वेगळ्या आणि शक्तिशाली अवतारात दिसतोय. या व्हिडीओच्या सुरुवातीला पाहताना असं वाटतं की हा कोणता हॉलिवूड चित्रपट आहे. मात्र, अखेरीस लक्षात येत की हा तर आपला भारतीय चित्रपट आहे. सगळ्यात लक्ष वेधी जो सीन आहे तो म्हणजे एका ठिकाणी एनटीआर त्याच्या हातात असलेलं अस्त्र फिरवतो आणि एक गोल आकार तयार होतो. शेवटी तो लाल समुद्र का आहे याविषयी त्यानं सांगितलं आहे. या व्हिडीओच्या शेवटी असं जाणवतं की समुद्रात मासे कमी आणि रक्त जास्त आहे. या चित्रपटातील प्रभावी डायलॉग्सनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर सैफ अली खान देखील आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.



देशभरातील चाहते आणि प्रेक्षक ‘देवरा’चं विश्व पाहण्यासाठी आतुरतेनं वाट पाहत होते. ‘देवरा’ या जगाची ओळख करून देणारी झलक आज प्रदर्शित झाली आहे. या व्हिडिओत समुद्र, जहाजे आणि रक्तपाताने भरलेल्या जगाची ओळख करून देण्यात आली आहे. NTR एका वेगळ्या आणि शक्तिशाली अवतारात दिसतोय. या व्हिडीओच्या सुरुवातीला पाहताना असं वाटतं की हा कोणता हॉलिवूड चित्रपट आहे. मात्र, अखेरीस लक्षात येत की हा तर आपला भारतीय चित्रपट आहे. सगळ्यात लक्ष वेधी जो सीन आहे तो म्हणजे एका ठिकाणी एनटीआर त्याच्या हातात असलेलं अस्त्र फिरवतो आणि एक गोल आकार तयार होतो. शेवटी तो लाल समुद्र का आहे याविषयी त्यानं सांगितलं आहे. या व्हिडीओच्या शेवटी असं जाणवतं की समुद्रात मासे कमी आणि रक्त जास्त आहे. या चित्रपटातील प्रभावी डायलॉग्सनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय