Wednesday, May 1, 2024
Homeकृषीबदलते हवामान आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा

बदलते हवामान आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा

पुणे : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे राज्यात थंडी कमी आहे. आज (ता. ९) मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट कायम असल्याने सोमवारी (ता. ८) राजस्थान मधील अलवर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात थंडी ओसरली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १४ ते २० अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे. आज (ता. ९) राज्याच्या किमान तापमानात वाढ टिकून राहण्याची शक्यता आहे.

लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यापासून गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ९) मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर येथे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय