Monday, May 6, 2024
Homeराज्य"चून चून के गिण गीण के मारे जायंगे", शिंदे गटाच्या आमदाराची शिवसेनेला...

“चून चून के गिण गीण के मारे जायंगे”, शिंदे गटाच्या आमदाराची शिवसेनेला धमकी

मुंबई : बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी तुफान राडा झाला होता. बुलढाण्यामध्ये काल शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम चालु असताना, आमच्या नेत्यांवर टीका का करता, म्हणत शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती.

या संपुर्ण राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत असतील तर ” चून चून के गिण गीण के मारे जायंगे, म्हणत शिंदे गटाचे बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेला धमकी दिली आहे. कालच्या राड्यात कमी झाले कारण त्याठिकाणी पोलीस होते, मात्र पुढच्या वेळेस आणखी जास्त राडा होईल” असा इशारा ही गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान, बुलढाण्यामध्ये शनिवारी ठाकरे गटाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात राडा झाला. त्यावेळी शिंदे गटाच्या पदाघधिकाऱ्यांनी खुर्च्यांची तोडफोड करत कार्यक्रम उधळून लावला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय