Wednesday, April 24, 2024
HomeNewsतुरूंगातील सर्वच कैदी स्वभावाने गुन्हेगार नसतात, कधीकधी परिस्थिती त्याला गुन्हा करण्यास भाग...

तुरूंगातील सर्वच कैदी स्वभावाने गुन्हेगार नसतात, कधीकधी परिस्थिती त्याला गुन्हा करण्यास भाग पाडते – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) गुजरात दौऱ्यावर आहेत. शहांनी अहमदाबादमध्ये स्मार्ट शाळांचं उद्घाटन केलं. यानंतर ते अखिल भारतीय जेल ड्युटी मीटमध्ये सहभागी झाले.

यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले, समाजाचा तुरुंगाकडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. काही वेळा काही घटना अशा घडतात की, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी व्हावे लागते आणि त्यांना शिक्षाही होते. शिक्षेची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. कारण शिक्षा नसेल तर, भीती नसते आणि भीती नसते तर शिस्त नसते, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना शहा म्हणाले, तुरुंगातील प्रत्येक व्यक्ती स्वभावानं गुन्हेगार नसतो. कधीकधी परिस्थिती त्याला गुन्हा करण्यास भाग पाडते, असं त्यांनी स्पष्ट केलं. समाज नीटनेटका ठेवण्यासाठी गुन्हेगारांना शिक्षा होणंही गरजेचं असल्याचे देखील तो म्हणाले.

यापूर्वी अमित शहांनी अहमदाबादमध्ये 4 स्मार्ट शाळांचं उद्घाटन केलं. एक दिवसीय दौऱ्यात गृहमंत्री अमित शाह अहमदाबाद, गुजरातमध्ये तीन कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय