जगताप यांना भरघोस मताधिक्य देण्याचा रावेत-किवळेमधील नागरिकांचा निर्धार (Chinchwad Vidhan sabh 2024)
शंकर जगताप यांच्या भव्य पदयात्रेत नागरिकांचा जल्लोष आणि प्रचंड उत्साह
मतदार संघातील लाडक्या बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी – शंकर जगताप
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चिंचवड विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात जवळपास एक लाखापेक्षा अधिक मतदारांची भर पडली आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांना मूलभूत सुविधा निर्माण करून देण्यावर मी भर देणार आहे. या मूलभूत सुविधा मिळाल्या तरच खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही; असा विश्वास महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी दिले. (Chinchwad Vidhan sabh 2024)
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांचा रावेत – किवळे, मामुर्डी परिसरात जोरदार प्रचार दौरा संपन्न झाला. या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जागोजागी फुलांच्या वर्षावात आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. (Chinchwad Vidhan sabh 2024)
प्रचाराचा शुभारंभ माळवाडी, आदर्श नगर, भीमाशंकर नगर, दत्तनगर, श्रीनगर, बाबदेव नगर, एम बी कॅम्प, विकास नगर, शिंदे पेट्रोल पंप, वीर बाबाचौक, साईनगर, राऊत नगर, मामुर्डी, आदर्श नगर, सिद्धार्थ नगर, श्री बाप देव महाराज मंदिर, किवळे गावठाण, समीर लॉस येथील सिल्वर लँड सोसायटी, मुकाई चौक येथील कोहिनूर सोसायटी, सिलॅस्टिन सोसायटी, सिल्वर ग्रासिया सोसायटी, चंद्रभागा कॉर्नर, सिल्वर गार्डनिया सोसायटीमध्ये शंकर जगताप यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी शंकर जगताप यांनी रावेत – किवळे परिसरातील मतदारांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत, समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. पदयात्रेत नागरिकांनी “कहो दिल से; महायुती फिरसे”, “शंकर जगताप तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अश्या घोषणा देत परिसर दणदणून सोडला होता.
या दौऱ्यात रावेत गावात झालेल्या बैठकीला सरपंच बाळासाहेब भोंडवे, मधुकर भोंडवे, नंदकुमार भोंडवे, धोंडे मामा भोंडवे, सतीश भोंडवे, तानाजी भोंडवे, दशरथ भोंडवे, राजेंद्र भोंडवे, विजय नाना भोंडवे, विलास भोंडवे, दीपक भोंडवे, पोपट भोंडवे, सोमनाथ भोंडवे, सुरेश तात्या भोंडवे, तुषार भोंडवे, शांताराम भोंडवे, बाबाजी तरस, संदीप भोंडवे, कुणाला भोंडवे, रामभाऊ भोंडवे, शैला पाचपुते, पुष्पा शेळके, पौर्णिमा पालेकर, वंदना जाधव आदी या वेळी उपस्थित होते.
तर पदयात्रेत माजी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, गणेश झेंडे, अनिल जगताप, धर्मपाल तंतरपाळे, बाळासाहेब तरस, गौतम गायकवाड, दीपक भोंडवे, माजी सरपंच सुदाम तरस, निलेश तरस, राजेंद्र तरस, बापू कातळे, दादा तरस, दिलीप राऊत, बिट्टू लांगे, नवनाथ लोखंडे, सुधीर साळुंखे, सुमित तरस, बाबाजी तरस, दशरथ साळुंखे, चंद्रकांत तरस, गौरव तरस, नवनाथ जांभुळकर, दत्ता काटकर, काका तरस, मोरेश्वर तरस, दिलीप कडलक, सुनील गायकवाड, संतोष मस्के, पूनम मस्के, करण सौदे, लखन गांधी, इंद्रपाल ऋतू, लखन आगळे, रितेश जाधव यांच्यासह युवा कार्यकर्ते, महिला भगिनी, जेष्ठ नागरिक, मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यावर माझा भर असेल
चिंचवड विधानसभा मतदारसंघात स्व. लक्ष्मण जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांच्या माध्यमातून आणलेली विकासाची गंगा अशीच अविरत सुरू राहण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यावर माझा भर असेल. कारण तळागाळातील नागरिकांचा विकास हेच महायुती सरकारचे सूत्र आहे. आणि त्याविचारधारेनुसारच मी तुमच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
– शंकर जगताप
(महायुतीचे उमेदवार)
हेही वाचा :
छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण
धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर
नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा
शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट
गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या
अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार
महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर