Friday, May 17, 2024
Homeजिल्हाघरकामगार मोलकरीणींच्या मुलांना शालेय साहित्य मदत गरजेची – विकास माळी

घरकामगार मोलकरीणींच्या मुलांना शालेय साहित्य मदत गरजेची – विकास माळी

नाशिक : दि. ६ ऑगस्ट 2023 रोजी आयटक कामगार केंद्र नाशिक येथे घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांना शालेय साहित्याचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन घरकाम मोलकरीण संघटना नाशिक (आयटक) तर्फे करण्यात आले होते. Children of domestic workers maids need help with school supplies – Vikas Mali

दिवसेंदिवस मुलांचे शिक्षण महागडे होत असल्याने मध्यमवर्गीय हैराण आहेत अशा वेळी लोकांच्या घरी- धुनी भांडी करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा असा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा असतो. घरकाम करणाऱ्या महिलांचे आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. अशा परिस्थितीत शिकणाऱ्या सदर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस हातभार लावण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा घरकाम मोलकरीण संघटना (आयटक)नाशिक तर्फे करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभाग कामगार उपायुक्त विकास माळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना उद्देशून विकास माळी यांनी भाष्य केलें. प्रत्त्येक विद्यार्थ्याने जिद्द ठेवली पाहिजे. प्रत्येकाला जन्मतःच गुण नसतात, ते गुण आत्मसात कराव्या लागतात. व्यवहारीक नॉलेज प्रत्येकाला आल पाहिजे. त्यासाठी भरपूर अभ्यास करणं महत्वाचं आहे. शिक्षण घेणं महत्वाचं आहे. मुलांना काय बनायचं हे त्याच्या कला गुना वरून ठरवा. शालेय साहित्य मदत जमा करुन वाटप उपक्रम गेली २०वर्ष सूरू असल्याबद्दल आयटक घरकाम संघटना चे कौतुक केले. व पुढील काळात मदतीसाठी नक्कीच हातभार लावणार असे आश्वासन दिले.

विकास माळी, राजू देसले, महादेव खुडे यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन कार्यक्रमास सुरूवात केली.

आयटकचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांनी आयटक कामगार संघटनेच्या माध्यमातून मदत केलेल्या विद्यार्थ्यांची धडपड बद्दल सांगताना, प्रयत्न केले तर आपले स्वप्न पूर्ण करणे नक्कीच शक्य असल्याने विद्यार्थ्यांनी न डगमगता परिस्थितीचा विचार न करता झेप घ्यावी, संघटना म्हणून आम्ही सोबत उभे आहोत असा विश्वास व्यक्त केला. समाजातील शिक्षणासाठी जाणीव असणाऱ्यांनी मदत करावी. ज्यानी मदत केली त्यांचे आभार मानले.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हाध्यक्ष कॉ. महादेव खुडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सदिच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्राजक्ता कापडणे यांनी केले.

घरकाम मोलकरीण संघटना नाशिक शहर कॉ. मीना आढाव, कैवल्य चंद्रात्रे, तल्हा शेख, पद्माकर इंगळे, प्रिया इंगळे उपस्थित होते. यावेळी घरकामगार मोलकरीण संघटना सल्लागार पद्माकर इंगळे यांची कन्या प्रिया इंगळे वैद्यकीय डॉक्टर झाल्याबद्दल विकास माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार भीमा पाटील यांनी मानले. यावेळी ५५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय