Tuesday, May 7, 2024
Homeजिल्हागटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत बच्चू कडू यांचे राजू देसले यांना आश्वासन

गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत बच्चू कडू यांचे राजू देसले यांना आश्वासन

नाशिक : गटप्रवर्तक आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आहेत. कंत्राटी कर्मचारी प्रमाणे काम करत आहेत. त्यांना कंत्राटी आरोग्य अभियान कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत कायम करण्याबाबत सूरू असलेल्या प्रक्रियेत गट प्रवर्तक यांचा समावेश करावा. अशी मागणी आयटक च्या वतीने कॉ. राजू देसले यांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांनी या गटप्रवर्तक मागणी संदर्भात आरोग्य मंत्री सोबत चर्चा करेल, असे आश्वासन दिले. 

निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत आशा गटप्रवर्तक यांना शासन सेवेत नियमित पदावर थेट समायोजन करणे बाबत. मागणी केली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत आशा गटप्रवर्तक सुपरवायझर २००८ पासून कंत्राटी म्हणून ऑर्डर मिळाली होती व कार्यरत आहे. कंत्राटी कर्मचारी म्हणून दैनंदिन कामकाज करीत आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचारी यांना शासन सेवक नियमित पदावर थेट समयोजन करणे बाबतच्या बैठकीत गटप्रवर्तकांचा समावेश करून उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना न्याय द्यावा, अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय