Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचिंचवड मतदार संघातील वीज समस्या सुटणार! स्वतंत्र वीज उपकेंद्राची उभारण्याची मागणी

चिंचवड मतदार संघातील वीज समस्या सुटणार! स्वतंत्र वीज उपकेंद्राची उभारण्याची मागणी

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा पाठपुरावा

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
: चिंचवड विधानसभा मतदार संघात भेडसावणारी वीज समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी स्वंतत्र वीज उपकेंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली आहे.

याबाबत महावितरण पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर झापाट्याने विकसित होत आहे. शहराच्या उपनगर भागात मोठ्या प्रमाणात नवीन व मोठे-मोठे गृहप्रकल्प, औद्योगिक वसाहती, आयटी कंपन्या उभ्या राहत आहेत. यामुळे या भागात विजेची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली आहे.

सध्यस्थितीला वाकड, ताथवडे, पुनावळे या भागांमध्ये नवीन गृहप्रकल्प विकसित होत आहेत. यामुळे घरगुती जोडणी, व्यवसायिक जोडणी अशा अनेक नवीन ग्राहकांची संख्या वाढली आहे. मात्र, केवळ बिजलीनगर व रहाटणी या दोन ठिकाणी जीव उपकेंद्र आहेत. या दोन उपकेंद्रांवर संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघाचा वीजपुरवठा अवलंबून आहे. परिणामी, वीज पुरवठा यंत्रणेवर मोठा ताण येत असून, वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढती लोकसंख्या आणि वीजेची मागणी याचा विचार करुन महावितरण प्रशासनाने तात्काळ स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारावे, अशी आग्रही मागणीही शंकर जगताप यांनी केली आहे.


मागणीनुसार वीज पुरवठा यंत्रणा विकसित करण्याची मागणी


चिंचवड विधानसभा मतदार संघातील वीज ग्राहकांची संख्या वाढलेली आहे. नवीन गृहप्रकल्प, व्यावसायिक वीज ग्राहक मोठ्या संख्येने असल्यामुळे वीज समस्या आणि तक्रारींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. वाढत्या मागणीनुसार, वीज पुरवठा यंत्रणा पायाभूत सुविधा विकसित करणे अनिवार्य आहे. त्यामुळे नवीन वीज उपकेंद्र उभारल्यास वीज पुरवठा सुनियोजित होईल. याबाबत महावितरण प्रशासनाला आग्रही मागणी केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय