Friday, May 17, 2024
Homeग्रामीणआळंदीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

आळंदीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

आळंदी : आळंदी नगरपरिषद, आळंदी पोलीस स्टेशन, आरंभ फाउंडेशन, यशवंत संघर्ष सेना, आळंदी जनहित फाउंडेश, एल्गार सेना, सकल धनगर समाज, झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्यासह विविध सेवाभावी संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने साजरी करण्यात आली.

अहिल्यादेवी समाज धर्मशाळेत याप्रसंगी यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे, उपाध्यक्ष भागवत काटकर, महिला आघाडी कार्याध्यक्ष योगिता काटकर, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, ओबीसी आघाडी शहराध्यक्ष माउली बनसोडे, शिवा संघटना अध्यक्ष सदाशिव साखरे, मल्हारी कानडे आदींनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती सांगून जीवन कार्याची ओळख करून दिली.

आळंदी येथील पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या नियंत्रणात पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांच्यासह विविध सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादनाने जयंती साजरी करण्यात आली.

आळंदी नगरपरिषदेत राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कर निरीक्षक रामराव खरात, लेखापरीक्षक विशाल बासरे, बांधकाम विभाग प्रमुख सचिन गायकवाड, मनोज राठोड, अभिषेक उमरगेकर आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

तसेच, आळंदीतील भाजी मार्केटमध्ये झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती प्रतिमा पूजन  पुष्पांजली अर्पण करत साजरी करण्यात आली.

संपादन – अर्जुन मेदनकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय