Thursday, May 2, 2024
Homeग्रामीणसुप्रियाताई चांदगुडे आणि आधार महिला मंडळ यांना पुरस्कार

सुप्रियाताई चांदगुडे आणि आधार महिला मंडळ यांना पुरस्कार

पिंपरी चिंचवड : पूर्णानगर, चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि भाजप शहर उपाध्यक्ष सुप्रियाताई चांदगुडे यांना दि 30 मे 2022 रोजी रत्नागिरी येथील दिव्यक्रांती सोसिएल फौंडेशन आणि बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट, बेळगावच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी “आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव” आणि त्यांच्या आधार महिला मंडळास ‘आदर्श महिला मंडळ प्रेरणा गौरव” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर गौरव सोहळा हा ऑटो क्लस्टर एक्सिबिशन सेंटर, चिंचवड येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष अभय भोर हे होते.

HQ दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी !

सदर गौरव हा सुर्यदत्त इन्स्टिट्यूटचे चेअरमन प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी आधार महिला मंडळाच्या संस्थापिका आणि पिंपरी चिंचवड शहर भाजपा उपाध्यक्ष सुप्रिया चांदगुडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. आधार महिला मंडळाच्या मार्फत सुप्रिया यांचे कार्य अतिशय बहुमूल्य असून महिलांच्या विकासासाठी त्या नेहमी पुढे असतात. आधार महिला मंडळाच्या सर्व सदस्य महिलाही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 129 पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिव्यक्रांती सोसिएल फौंडेशनने सुप्रिया यांच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना व त्यांच्या संस्थेला दिल्याचे डॉ. विक्रम शिंगाडे यांनी सांगितले. त्या नेहमी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणि महिला सक्षमीकरण त्यांचा नेहमी भर असतो.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

आयडीबीआय बँकेत तब्बल 1544 जागांसाठी मेगा भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय