Sunday, May 19, 2024
Homeजिल्हामाकपच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

माकपच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

मराठवाडा मुक्ती संग्राम : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य सेनानी कॉ. विठ्ठलराव नाईक, माजी खासदार कॉ. गंगाधर आप्पा बुरांडे, एडवोकेट कॉ. मनोहर टाकसाळ दादा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पक्षाचे दिवंगत नेते कॉ. विठ्ठल मोरे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. Celebrating Marathwada Liberation Struggle Day on behalf of CPIM

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सकाळी माकप कार्यालयासमोर जिल्हा सचिव कॉ.भगवान भोजने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माकपचे श्रीकांत फोपसे, डॉ. भाऊसाहेब झिरपे डॉ.सेलम डॅनियल, प्रकाश पाटील, रखमाजी कांबळे, अजय भवलकर, विशाल भूमरे, दादासाहेब शिंदे, लोकेश कांबळे, रवी मोताळे, रमेश जोशी, रवी शिरसाठ, सिमा शिंदे, समाधान बारगळ, कुलकर्णी इ पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय