Wednesday, May 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचाकण : आपच्या वतीने तालुकास्तरीय कार्यकर्ता बैठकीचे आयोजन

चाकण : आपच्या वतीने तालुकास्तरीय कार्यकर्ता बैठकीचे आयोजन

चाकण : आम आदमी पार्टी खेड-आळंदी विधानसभा (खेड तालुका) “जनशक्ती अभियाना” अंतर्गत तालुकास्तरीय कार्यकर्ताच्या बैठकीचे बुधवार दि.२० सप्टेंबर दुपारी ३:३०वा. बजेट मार्ट पार्किंग, आंबेठाण चौक, चाकण येथे आयोजन करण्यात आले आहे. चाकण येथे होणाऱ्या या बैठकीमध्ये विविध गोष्टींवर चर्चा होणार आहे. Organization of taluka level workers meeting on AAP behalf

यामध्ये तालुक्यात आम आदमी पक्षाची मजबूत बांधणी करण्याबाबत चर्चा करणे. पक्षाच्या विचारांच्या कार्यकर्त्यांचा संच तयार करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे. स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेणे व तयारीला लागणे. पक्षाची धोरणे व त्याची अंमलबजावणी बाबत चर्चा करणे. विभाग नुसार जबाबदाऱ्याची वाटणी करणे. सभासद नोंदणी वाढवण्यावर भर देणे व त्याची नियोजन करणे. तालुक्यातील व इतर सामाजिक महत्त्वाच्या प्रश्न संदर्भात लढा उभारण्यासाठी आंदोलने/ निवेदने याबाबत चर्चा करून अंमलबजावणीसाठी नियोजन करणे, तसेचऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

खेड तालुक्यात आम आदमी पार्टीच्या विचाराच्या कार्यकर्त्यांनी सदर मिटींगला उपस्थित राहून पक्षाच्या वाढीसाठी सहकार्य करावे. एक नवा दृष्टिकोन घेऊन तालुक्यात परिवर्तन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांनी केले आहे. संपर्क : 9762331727

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय