Saturday, May 18, 2024
Homeराज्यलाचखोर मनपा शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडली 85 लाखांची रोकड; 45 तोळे सोनं आणि बरंच...

लाचखोर मनपा शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडली 85 लाखांची रोकड; 45 तोळे सोनं आणि बरंच काही…

नाशिक : मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह लिपिकाला 55 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार मुख्याध्यापकास शैक्षणिक संस्थेने रुजू करून घेण्यासाठीचे पत्र त्या संस्थेला देण्याच्या मोबदल्यात सुनीता धनगर यांच्यासह लिपिकाला 55 हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल (दि. 2) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

लाचखोरीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांच्या घराची झडती घेण्यात आली असून या घरझडतीत तब्बल 85 लाखांची रोकड व 45 तोळे सोने सापडल्याने खळबळ उडाली आहे.

या कारवाई नंतर धनगर यांच्या घराची झडती घेण्यात आली. या घरझडतीमध्ये 85 लाख रुपये कॅश, 45 तोळे सोने आणि तीन प्रॉपर्टीचे कागदपत्र हस्तगत करण्यात आली आहे. तसेच घरही सील करण्यात आले आहे. धनगर यांचे नाशिकमध्ये दोन फ्लॅट आणि एक प्लॉट आहे. ते राहत असलेला फ्लॅटची किंमत दीड कोटी रुपये इतकी आहे. धनगर यांचा आडगावला प्लॉट आणि टिळकवाडीत दुसरा फ्लॅट आहे. दरम्यान धनगर यांची बॅंक खाती तपासणे अद्याप बाकी आहे. या कारवाईनंतर महापालिकेच्या शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.

सुनीता सुभाष धनगर (57, रा. रचित सनशाइन, उंटवाडी, नाशिक) व नितीन अनिल जोशी (45, रा. पुष्पांकुर, चव्हाणनगर, तपोवन, नाशिक) अशी दाेघा लाचखाेरांची नावे आहेत. धनगर या वर्ग दाेनच्या अधिकारी, तर जाेशी हा वर्ग तीनचा कर्मचारी आहे.

50 वर्षीय तक्रारदार हा मुख्याध्यापक असून, ताे एका खासगी शैक्षणिक संस्थेत कार्यरत हाेता. त्याचदरम्यान संस्थेने त्यांना बडतर्फ केले आहे. कारवाईच्या विराेधात त्यांनी नाशिकच्या शैक्षणिक न्यायाधीकरणात दाद मागितली हाेती. त्यामुळे न्यायाधीकरणाने बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती दिली. तरीदेखील संस्थेने या मुख्याध्यापकास सेवेत दाखल करून घेतले नाही. त्यानंतर त्यांनी मनपाच्या शिक्षणाधिकारी धनगर यांच्याकडे संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी धनगर यांनी संस्थेला पत्र काढण्याकामी तक्रारदार मुख्याध्यापकाकडे 50 हजार रुपयांची लाच मागून कार्यालयातच स्वीकारली. दरम्यान, लिपिक जाेशी याने हे पत्र बनवण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेतल्याचे निष्पन्न झाले.

सदरची कारवाई एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार, वैशाली पाटील यांच्या सूचनेने पोलिस निरीक्षक संदीप घुगे, गायत्री जाधव आणि हवालदार एकनाथ बाविस्कर, पोलिस नाईक प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी सापळा लावून केली. दाेघांना अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर दाेघांच्या घरांची झडती घेतली जात असून, त्यातूनही मोठे घबाड समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 हे ही वाचा :

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

 नोकरीच्या बातम्या : 

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय