Sunday, May 5, 2024
Homeराज्यराऊत – पवार जुंपली; संजय राऊतचा अजित पवारांवर जोरदार पलटवार

राऊत – पवार जुंपली; संजय राऊतचा अजित पवारांवर जोरदार पलटवार

Sanjay Raut × Ajit Pawar : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज (3 जून) पुन्हा एकदा आक्रमक पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार संजय शिरसाट आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेऊन प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत थुंकल्याचा आरोप केला जातो आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.

मात्र, अजित पवारांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना म्हणाले, “यशवंत चव्हाणांनी आपल्याला सुसंस्कृत राजकारणाचा धडा दिला आहे. प्रत्येक राजकीय नेत्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं.”

यावर बोलताना संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं’ असं म्हणत राऊत यांनी अजित पवार यांना जोरदार टोला लगावला. इतकेच नव्हे तर अजित पवार यांच्याबद्दल संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या संतापही व्यक्त केला.

संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत म्हटले की, शिंदे गटातील लोक बेईमान आहेत. त्यामुळे लोकच त्यांना जोडे मारत आहेत. लोक निवडणुकीची वाट पाहात आहेत, असे सांगतानाच माझ्या जिभेला दात लागतो. त्यामुळे मला थुंकण्यासारखी कृती करावी लागते. मात्र, या बिंडोक लोकांना असे वाटते की, लोक आपल्यावरच थुंकत आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी सर्वांनी जबाबदारीचे भान ठेऊन वागावे आणि बोलावे, असा सल्ला दिला असल्याचे प्रसारमाध्यमांनी राऊत यांना सांगितले, यावर राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. ‘धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं’ असं म्हणत ‘ज्याचं जळतं त्यालाच कळतं’, असं संजये राऊत म्हणाले.

 हे ही वाचा :

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

 नोकरीच्या बातम्या : 

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय