Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणमुखेड तालुक्यात वन्य प्राण्याचा सुळसुळाट झाल्यामुळे कार पलटी

मुखेड तालुक्यात वन्य प्राण्याचा सुळसुळाट झाल्यामुळे कार पलटी

मुखेड : आंबुलगा – राजूर मार्गावरून जाणाऱ्या हरणांच्या कळपाला वाचवण्यात एक कार पलटी झाली. मुखेड तालुक्यातील आंबूलगा ते राजुरा मार्गावर दि ४ आँगस्ट रोजी सकाळी ९ वाजता च्या सुमारास आंबुलगा मार्गे जाहूर कडे जात असताना ही घटना घडली. 

आंबुलगा शिवारातील पिकात चरत असलेले हरणाचे कळप अचानक पणे रस्त्यावर पळत आले त्यामुळे कार चालकाचा ताबा सुटला आणि हरणाच्या कळपाला वाचवण्यासाठी कार चालकांनी कार रस्त्याच्या खाली उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र रस्ता छोटा आणि रस्त्याचे साईड पट्टे मजबूत नसल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या लवणात पलटी झाली. 

या कारमध्ये फक्त चालक एकटाच असल्यामुळे मोठी जिवित हानी टाळली, अन्यथा मोठा अपघात झाला असता. मात्र कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना समजताच आंबुलगा गावातील तरूण मदतीसाठी धावले. कारमध्ये ड्रायव्हर एकटेच असल्यामुळे ते सुखरूप बचावले.

ग्रामीण भागातील रस्ते ही अतिशय छोटे असतात आणि रस्ते ही निकृष्ट दर्जाचे बनवले जातात. रस्ते बनवल्यावर रस्त्याच्या साईड पट्टे चांगले मजबूत नसल्यामुळे दोन वाहनांना एकमेंकाना साईड देताना मोठी कसरत करावी लागते. रस्त्याच्या खाली गाडी घ्यावे लागते. मात्र साईड पट्टे मजबुत नसल्याने आणि रस्त्याच्या बाजूला दोन्ही साईडने लवण असल्याने गाडी रस्त्याच्या बाजूच्या लवणात पलटी होण्याची भिती नेहमी चालकांना वाटते. मात्र संबधीत प्रशासन काम होत असताना कामाच्या ठिकाणी येऊन पाहणी करत नाहीत. त्यामुळे ठेकेदार ओबडधोबड काम केले जाते. हप्ते घेतले जातात, अशी उलट सुलट चर्चा घटनस्थळी चालू पहावयास मिळाली.

मुखेड तालुक्यात हरणांची संख्या यंदा वाढल्याचे चित्र दिसतंय, त्यातून असे अपघात वाढत चालले आहेत. मुखेड तालुक्यात वन्यप्राण्याचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झालाय त्यामुळे पिकाचेही मोठे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वनविभागाने याकडे लक्ष द्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय