पुणे, दि. १०: अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत अनुदानावर गोदाम बांधकामासाठी अनुदान देण्यात येणार असून इच्छुक शेतकरी उत्पादक संघ आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. (Godown Subsidy)
पुणे जिल्ह्याकरिता २५० मे. टन गोदाम बांधकामासाठी (Godown Subsidy) अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्यासाठी २ व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानअंतर्गत गळीतधान्यासाठी एका गोदाम बांधकामाचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त आहे. यासाठी प्रत्यक्ष झालेल्या बांधकामाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी कमी असलेली अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
ही योजना बँक कर्जाशी निगडीत असल्याने अर्जदारांनी प्रस्ताव सादर करताना केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी, संघ या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करताना महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिझाइन्स, तपशील व खर्चाच्या अंदाजपत्रकासह अर्ज सादर करावेत.
शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी अर्जासोबत सभासद यादी, मागील वर्षीचे ऑडीट रिपोर्ट व ७/१२, ८ अ उतारा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सादर करावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी कळविले आहे.
हेही वाचा :
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!
Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी
मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण