Friday, April 26, 2024
Homeराष्ट्रीयब्रेकिंग : आता "इंजिनियरिंग" करा आपल्या, भाषेमध्ये... वाचा सविस्तर

ब्रेकिंग : आता “इंजिनियरिंग” करा आपल्या, भाषेमध्ये… वाचा सविस्तर

AICTE ने 11 स्थानिक भाषांमधील अभ्यासक्रमास दिली मंजुरी

नवी दिल्ली : इंजिनीअरिंग म्हटलं तर इंग्लिश भाषा यायलाच हवी हे सर्वांना माहीतच आहे, इंजीनियरिंग कडे तरुणांचा सर्वात जास्त कल आहे. परंतु अनेकदा इंग्रजी भाषेमुळे इंजिनीअरिंग करणे अनेकांना अवघड जाते. त्यामुळे इच्छा असूनही अनेक तरुण इंजिनिअरिंग करू शकत नाही. परंतु आता आपल्या सोयीच्या भाषेत बी. टेक शिक्षण  घेण्याची इच्छा असणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने 11 स्थानिक भाषांमध्ये बी. टेक च्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिली आहे.

या संदर्भातील माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, मल्याळम, बंगाली, असामी, पंजाबी, आणि उडिया या 11 भाषांमध्ये विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगचं शिक्षण घेता येणार आहे. या निर्णयामुळे तरुणांना दिलासा मिळाला आहे. 

विविध विभागांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर देण्यात आला आहे, असे प्रधान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे 8 राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी नव्या शैक्षणिक वर्षापासून स्थानिक भाषांमधून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

या निर्णयामुळे इंग्रजी भाषेचा अडथळा असलेल्या अनेक तरुणांचे आपल्या भाषेतून इंजीनियरिंग करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.

संपादन – आरती निगळे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय