Friday, March 29, 2024
Homeग्रामीणजुन्नर : खैरे - खटकाळे, आंबोलीसह या गावांच्या सुनावण्यांना मिळाला मुहूर्त, पेसा...

जुन्नर : खैरे – खटकाळे, आंबोलीसह या गावांच्या सुनावण्यांना मिळाला मुहूर्त, पेसा निधी आणि जनजागृतीचा मुद्दा

जुन्नर पंचायत समितीत वर्षांपासून रखडलेल्या १८ सुनावण्या पैकी ३ सुनावण्याना २२ जुलैचा मुहूर्त

डॉ. कुंडलिक केदारी आणि खैरे ग्रामस्थ हजर राहणार

जुन्नर : जुन्नर पंचायत समितीत वर्षांपासून रखडलेल्या १८ सुनावण्या पैकी ३ सुनावण्याना २२ जुलैचा मुहूर्त मिळाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. कुंडलिक केदारी आणि खैरे ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.

केदारी यांनी पेसा ग्रामपंचायतींनी पेसा निधीचा वापर कोठे केला, पेसा जनजागृती कार्यक्रमासाठी काय केले, खर्चाच्या छायाकिंत प्रती मागवल्या होत्या. परंतु ग्रामपंचायतींकडून माहिती उपलब्ध करुन दिली जात नाही.

जुन्नर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीवर गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण राहिले नाही. पेसा कायदा अंमलबजावणी कडे लक्ष सुध्दा नाही. माहिती अधिकार कायद्याला कोणीही जुमानत नाही, हि बाब चव्हाट्यावर आली आहे, असेही डॉ. केदारी म्हणाले.

ग्रामसेवकांच्या नियमबाह्य कामाकडे डोळेझाक केले जाते ही बाब डॉ. कुंडलिक केदारी यांनी माहिती अधिकारातून पाठपुरावा केल्यानंतर निदर्शनास आली आहे.

ग्रामपंचायत पूर, भिवाडे, आंबोली, उच्छिल, फांगुळगव्हाण, पाचघर, खैरे – खटकाळे, यांचेवर १८ सुनावण्या पैकी खैरे – खटकाळे, आंबोली, उच्छिल यांची सुनावणी पंचायत समितीत दि. २२ जुलै रोजी होणार असून डॉ. कुंडलिक केदारी आणि खैरे ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. 

तसेच यापूर्वी आदेश देऊन सुध्दा घाटघर, चिल्हेवाडी, तळेरान यांनी अजून सुध्दा उत्तर दिलेली नाहीत. या कारभाराचा पर्दाफाश १२ जुलै रोजी होणार आहे, असेही डॉ. केदारी म्हणाले.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय