दमास्कस : सीरियाच्या लष्करी महाविद्यालयावर ड्रोन हल्ला हल्ला करण्यात आला आहे, त्यामध्ये किमान 100 कॅडेट्स मृत्यू आणि 240 जखमी झाल्याची बातमी नुकतीच हाती आली आहे.
सीरियातील होम्स शहरात असलेल्या मिलिटरी कॉलेजच्या परेड मैदानावर पदवीदान समारंभात हा हल्ला करण्यात आला. सीरियन सरकारने हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय पाठिंबा असलेल्या विद्रोही गटाला जबाबदार धरले आहे.
2011 पासून सिरीयात गृहयुद्ध सुरू आहे, सीरियातील मोठा ड्रोन हल्ला म्हणून याकडे पाहिले जात आहे. सीरियावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात रक्तरंजित हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यानंतर सीरियन सैन्याने विद्रोही गटाच्या इडलीब प्रांतावर भीषण हल्ले सुरू केले आहेत.