Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएस.एम.जोशी कॉलेजमध्ये ई- कचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये ई- कचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

हडपसर / डॉ. अतुल चौरे : एस. एम. जोशी कॉलेजमधील डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स व एप्लीकेशन विभागामार्फत ई-कचरा व्यवस्थापनासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे व क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महालक्ष्मी ई कचरा व्यवस्थापन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मनोज मेहता उपस्थित होते. E-waste management workshop concluded in SM Joshi College

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक कचरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा कचरा नैसर्गिकरीत्या नष्ट होत नाही. त्यासाठी रिसायकल यंत्रणा राबवावी लागते. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. पुढील पिढीला स्वच्छ पर्यावरण द्यायचे असेल तर पर्यावरणाचा ऱ्हास थांबविला पाहिजे. ई-कचरा जाळणे हा ई-कचरा नष्ट करण्यावरील उपाय नाही. कारण त्याच्या ज्वलनातून आणखी घातक वायूंची निर्मिती होते व वायू प्रदूषण होते. 

ई-कचऱ्याच्या ज्वलनातून जल, वायू व भू प्रदूषण होते. मानवाला नाविन्याची आवड आहे. सतत नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या जातात व जुन्या वस्तू फेकून दिल्या जातात. पण नवीन वस्तू खरेदी करण्याअगोदर ग्राहकांनी खरच त्या वस्तूंची गरज असेल तरच त्या वस्तू खरेदी कराव्यात. तसेच जुन्या वस्तूंची गरज नसल्यास इतर गरजू लोकांना त्या वस्तू द्याव्यात. म्हणजे त्या वस्तू वापरात राहतील. जागतिक पातळीवर ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची प्रणाली विकसित करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. विभागाचे समन्वयक व उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे म्हणाले की, ई-कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी सामान्य नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. ई- कचरा कमी करण्यासाठी रिड्यूस, रिसायकल व रि-यूज ही त्रिसूत्री अवलंबण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. मानवाला विकास व विनाश यामध्ये समतोल राखावा लागेल. त्यातूनच भविष्यातील पिढ्यांसाठी आपण स्वच्छ पर्यावरण राखू शकतो. असे मत व्यक्त केले. 

कम्प्युटर सायन्स विभागाच्या विभागप्रमुख प्रा.संगीता यादव म्हणाल्या की, ई- कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्या स्थापन होत आहेत. अशा कंपन्यांची गरज भविष्यात वाढत जाणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी याकडे एक उत्तम व्यवसाय म्हणून पहावे.

पाहुण्यांचा परिचय प्रा.नमिता माने यांनी तर आभार प्रा.मेघाली भामरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नयन पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी कम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय