Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपुणे मनपाच्या मेरी मिट्टी मेरा देश अभियान उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद 

पुणे मनपाच्या मेरी मिट्टी मेरा देश अभियान उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद 

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : पुणे मनपाच्या वतीने आज शुक्रवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे आयोजित ‘माझी माती माझा देश’ अंतर्गत अमृत कलश मे. राज्यशासनाकडे सुपूर्त करण्यासाठी कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला होता. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनतर केतन नवले मर्दानी खेळ असोसिएशनच्या सदस्यांनी मर्दानी खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. Citizens’ response to Meri Mitti Mera Desh Abhiyan initiative of Pune Municipality

यावेळी अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त अजित देशमुख, सचिन इथापे, महेश पाटील, डॉ. चेतना केरूरे, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते अमृत कलश राज्यशासनाकडे सुपूर्द करण्यात आला.  

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात तसेच पुण्यात दिनांक ९ ऑगस्ट, २०२३ अर्थात क्रांतिदिनी ‘मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाला सुरुवात झाली. मातीला नमन, वीरांना वंदन या घोषवाक्यासह या अभियान राबवताना संपूर्ण देशासह पुण्यात देखील उत्साह होता. दि. २७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदान येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री (सांस्कृतिक कार्य), विरोधी पक्ष नेते संसद सदस्य, विधीमंडळ सदस्य, मुख्य सचिव आणि वरीष्ठ अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरीकांच्या उपस्थितीत एक भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात सर्व महापालिकांचे अमृत कलश जमा करून ते दिल्लीला पाठवण्यात येणार आहेत.

 

कार्यक्रमात बोलताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, पुणे महापालिकेने ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम राबवताना अनोखा प्रयोग केला आहे. हा प्रयोग संपूर्ण भारतात निश्चितच वेगळा ठरेल. हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. शहरातील ३३ हजार नागरिकांनी पंचप्रण शपथ घेतली आणि विविध प्रभागात ११ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. 

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मनोगत व्यक्त करताना उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील ३३ हजार नागरिकांनी पंचप्रण शपथ घेतली आणि विविध प्रभागात ११ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. विविध घटकांद्वारे क्षेत्रीय कार्यालय निहाय एकूण १३८ ठिकाणांहून माती गोळा करून त्याचा अमृत कलश तयार करण्यात आला होता. तर १ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान पुणे जिल्ह्यातील ८६ हजार ७२३ घरांमधून माती संकलित करण्यात आली, अशी माहिती दिली. तसेच संपूर्ण पुणेकर नागरिक, मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त डॉ. चेतना केरूरे यांनी व्यक्त केले. 

अमृत कलश यात्रेत १७ हजार ६५० नागरिक / लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणांहून ढोल-ताशांच्या गजरात मूठभर माती आणि मूठभर तांदूळचे संकलन केले. तसेच ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केले, अशा वंदनीय स्वातंत्र्य सैनिक व वीरांचे स्मरण करून पंचप्रण शपथ घेण्यात आली. तसेच अमृत वाटिका असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमांची सांगता आज करण्यात आली. आजच्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक सोनवलकर यांनी केले.
https://maharashtrajanbhumi.in/ssc-bharti-staff-selection-commission-recruitment-for-stenographer/

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय