Monday, May 6, 2024
Homeकृषीब्रेकिंग न्यूज : सुप्रीम कोर्टाकडून नव्या शेतकरी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती; केंद्राला झटका

ब्रेकिंग न्यूज : सुप्रीम कोर्टाकडून नव्या शेतकरी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती; केंद्राला झटका

नवी दिल्ली : आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा झटका दिला असून नव्या शेतकरी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत अखेर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून नवीन तिन्ही कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली असून समितीचं गठण करण्यात आलं आहे.

या समितीत चार जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने कडक शब्दात केंद्राला सुनावलं होतं. ते म्हणाले की, कोर्टाकडून तयार केलेल्या समितीमध्ये चर्चा होईपर्यंत हा कायदा होल्ड करायला हवा. अन्यथा कोर्टाकडून हा कायदा रोखण्यात येईल. यानंतर केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात प्रारंभिक प्रतिज्ञापत्र दाखल केले होते .

परंतु आज सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाच्या निकालाने सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा विजय झाल्याचा सुर उमटत असला तरी संयुक्त किसान मोर्चाने अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय