Wednesday, May 22, 2024
Homeजिल्हाधक्कादायक : हसण्याच्या वादावरून भाजीपाला विक्रेत्यांचे कोयत्याने छाटले दोन्ही हात

धक्कादायक : हसण्याच्या वादावरून भाजीपाला विक्रेत्यांचे कोयत्याने छाटले दोन्ही हात

नांदेड : नांदेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून तरूणाचे थेट दोन्ही हात कोयत्यानं तोडल्याची धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मोहम्मद अजहर असं या हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नांदेड शहरातील डी मार्ट परिसरात मोहम्मद अजहर हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्याच शेजारी मोहम्मद तोहीद हा तरुण देखील हातगाड्यावर फळ विक्री करत होता. यावेळी हसण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी मोहम्मद तोहीद याने बाजारातून कोयता खरेदी करुन कोयत्याने मनगटापासून दोन्ही हात छाटले. इतकेच नाही तर पायावर आणि पाठीवर देखील कोयत्याने वार केले. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. आठवडी बाजारात भर दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मोहम्मद अजहर याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मोहम्मद तोहीद त्याच्याविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय