Monday, May 20, 2024
Homeग्रामीणशहापूर तालुक्यात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन

शहापूर तालुक्यात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन

शहापूर (प्रतिनिधी):- अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी व श्रमिक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ २७ मे रोजी देशव्यापी विरोधात हाक दिली होती. शहापूर तालुक्यात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

            शहापूर तालुक्यातील शिसवली, तलवाडा, बोराला, राजपुरीसह अनेक गावांचा सहभाग राहिला. माकपचे तालुका सचिव भरत वलंबा, किसान सभेचे तालुका सचिव कृष्णा भावर, सुनिल करपट, विजय विशे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

            यावेळी भास्कर म्हसे, अंकुश रोज, सुनिल मासमारे, देवजी पानगा आदी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय