Monday, May 20, 2024
Homeग्रामीणलोकमान्य टिळक महाविद्यालयात वसंतराव नाईक जयंती साजरी

लोकमान्य टिळक महाविद्यालयात वसंतराव नाईक जयंती साजरी

(वडवणी/प्रतिनिधी) वडवणी शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात कृषिरत्न वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे अध्यक्ष पंजाबराव मस्के प्राचार्य डॉ. के. एम. पवार यांच्या हस्ते वसंतराव नाईकांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

    याप्रसंगी पंजाबराव मस्के, प्राचार्य डॉ. के. एम. पवार यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. शेती आणि शेतकरी यांच्याविषयी वसंतराव नाईकांच्या मनात आदर होता त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेतीतील उत्पन्न भरमसाठ वाढवले आणि महाराष्ट्रात हरितक्रांती केली, असे उद्गार प्राचार्य डॉ. के. एम. पवार यांनी काढले.

        वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यासाठी डॉ. महेशराजे निंबाळकर प्रा. सुधीर पोकळे डॉ. सच्चिदानंद तांदळे डॉ. राम मायकर प्रा. सतीश भालेराव प्रा.संजय साळुंके डॉ. भालचंद्र कुलकर्णी, प्रा. अशोकराव खेत्री, डॉ. मनीषा ससाने, प्रा. गोपीचंद  घायतिडक, प्रा. गंगाधर घोडेराव, प्रा. नागनाथ साळुंके, प्रा. गोपाळ मस्के, प्रा. प्रतिभा शेळके, प्रा.देविदास दडपे, प्रा.भोसले सर उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय