Sunday, April 28, 2024
Homeग्रामीणया निसर्ग प्रेम असणाऱ्या मित्र परिवाराने राबवली पंचगंगा नदीकाठ स्वच्छता मोहीम

या निसर्ग प्रेम असणाऱ्या मित्र परिवाराने राबवली पंचगंगा नदीकाठ स्वच्छता मोहीम

कोल्हापूर(प्रतिनिधी) :- भाई माधवराव बागल यांच्या जयंतीनिमित्ताने पंचगंगा बचाओ मित्र परिवाराच्या वतीने पंचगंगा नदीच्या काठावरील प्लास्टिक कचरा, निर्माल्य, कपड्यामध्ये बांंधलेल्या ओट्या, दुधाच्या पिशव्या, चुन्याच्या डब्या,गुटक्याच्या पुड्या, तुटलेली चपले, बुट लेदर बँगा,देवाचे फोटो,ठरल्या प्रमाणे देवळांंमध्ये च्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या इत्यादी साचलेला कचरा साफ करून नदीला श्वास घेण्यास मोकळे केले.

          पावसाळ्यात तो कचरा काही प्रमाणात परत जाणार नाही याची या मित्र परिवाराने व्यवस्था केली. नदीमधील होणारे प्रदूषण एक हातभार या ग्रुपने लावला आहे.

          या मोहीमेमध्ये विजयकुमार पाटील, अतुल पाटील, स्वराज्य पाटील, मनिषा पाटील, शिवरूप शेटे, अभिषेक घाग, सुरज पाटील, सुशांत किरमीटे आदींनी भाग घेतला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय