Monday, May 13, 2024
Homeग्रामीण'युथ फेडरेशन'चे कोल्हापूरात आंदोलन

‘युथ फेडरेशन’चे कोल्हापूरात आंदोलन

         

कोल्हापूर(२४ मे) :- देशभरात कोरोना मुळे विदारक परिस्थिती तयार झाली आहे केंद्र सरकार या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. आर्थिक पॅकेज स्वरूपात मदत अपेक्षित असताना कर्ज पॅकेज जाहीर केले गेले आहे. सरकारने लोकांच्या समस्यांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे .म्हणूनच या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधावे यासाठी संपूर्ण देशभर ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने २३ मे देशव्यापी मागणी दिन राबविण्यात आला. कोल्हापूर जिल्हा शाखेने बिंदू चौक येथील कार्यालयाजवळ शारीरिक अंतर राखत हे आंदोलन केले.

     

आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :   

* स्थलांतरित मजुरांना वाहतुकीची सोय करून त्यांच्या घरी पोहोचवा.

 * देशातील १५ कोटी गरीब कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत निधी द्या.

* प्रत्येक बेरोजगाराला दहा हजार रुपये भत्ता द्या.

* BNEGA योजना लागू करा.

* सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण थांबवा.  

* कामगार कायद्यांची मोडतोड थांबवा कामगारांना कायद्याने संरक्षण द्या.

* सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण थांबवा कोरोना संकटाच्या नावावरती देशाच्या संपत्तीची लूट थांबवा.

* आर्थिक पॅकेजच्या नावाखाली कर्ज नको आहे कायमस्वरूपी आर्थिक मदत हवी आहे.

*असंघटित कामगार, फेरीवाले यांच्या  खात्यावर दहा हजार रुपये महिना द्या.

*अति श्रीमंतांच्यावर कोरोना कोरोना टॅक्स लावा.

* विनाशर्त रेशनचे धान्य, रॉकेल, डाळी, व साखर त्वरित वाटप करा. 

* विडी कामगाराना २००० जीवन भत्ता द्या. 

* स्थलांतरित कामगारांना ज्यादा बस आणि रेल्वे उपलब्ध करा. १०,००० रुपये स्थलांतरीत भत्ता द्या. 

* केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला विनाशर्त अर्थसहाय्य करा. 

*नोकरभरती वरील बंदी उठवावी व जागा तात्काळ भराव्यात. 

*शेतकऱ्यांना खाजगी व पतसंस्था कर्जमाफी द्या. 

*मनरेगाची मजुरी व दिवस वाढवा. 

*वृद्ध, विधवा व विकलांग यांना सामाजिक सुरक्षा द्या.  

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय