Saturday, April 27, 2024
Homeग्रामीणनित्रुड येथील संचारबंदीमुळे माकपाचा ग्रुप आपल्या जीवची परवा न करता ग्रामस्थाच्या सेवेला.

नित्रुड येथील संचारबंदीमुळे माकपाचा ग्रुप आपल्या जीवची परवा न करता ग्रामस्थाच्या सेवेला.

नित्रुड येथील संचारबंदीमुळे माकपाचा ग्रुप आपल्या जीवची परवा न करता ग्रामस्थाच्या सेवेला.

माजलगाव:- (प्रतिनिधी)

          कोरोना महामारीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या मदतीसाठी मा.क.पा.चा ग्रुप आपल्या जीवाची परवा न करता रस्त्यावर उतरून काम करत आहे.गेल्या आठवड्यात नित्रुड मध्ये एकाच दिवशी 11 रिपोर्ट पोझिटिव  निघाल्याने गावात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे,यामुळे नागरिकांची ग़ैरसोय होऊ नये यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष(माकप) चा ग्रुप आपल्या जीवाची परवा न करता पाणी, किराणा व इत्यादी जीवनावश्यक वस्तु घरपोच सुविधा सुरु केली आहे. गावातील तसेच परिसरातिल नागरिकांकडून थेट सोशल मिडीयावर मागणी नोंदवुन त्यांना आवश्यक वस्तु देण्याचे काम करण्यात येत असल्याने नागरिकांतुन समाधन व्यक्त होत आहे.नित्रुड गावासह परिसरात संचारबंदी  लागू करण्यात आली आहे.

         

           संचारबन्दीमुळे सर्वकाही बंद असून गावातील नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही.यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासना समेत माकपाने हा उपक्रम हाती घेतला आहे.ग्रामपंचायतचे शिपाई कर्मचारी तसेच माकपा नेते कॉ दत्ता डाके,यांच्या मार्गदर्शनाखाली अड़ अशोक डाके,जनक तेलगड,भाऊसाहेब रणदिवे,दत्ता गायकवाड़,महारुद्र कोथिम्बीरे,ग्रा.प सदस्य शेख खलील भाई, पोपट गायकवाड़,बसवेश्वर मोगरकर,पांडुरंग रामकिसन डाके,अशोक तातोडे आदी,हे काम हिरिरिने करत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव आवश्यक ती सर्व खबरदारी सम्बंधित व्यक्तिकडून घेण्यात येत.अडचणीच्या काळात माकपाच्या ये उपक्रमाने जीवनावश्यक वस्तु घरपोच मिळत असल्यामुळे नागरिकांकडून समाधन व्यक्त होत आहे.

==========================

संचारबंदमुळे लोकांना घरा बाहेर पड़ता येत नाही, कोरोनाच्या या संकट काळात माकपाच्या वतीने नित्रुडगावासह  परिसरातील सर्वसामान्यसाठी आवश्यक ते सर्व मदत करत आहेत  कोरोनामुळे उद्बावलेल्या परिस्थितिवर लवकरच आम्ही मात करू.

कॉ.दत्ता डाके

माकपा नेते

==================================

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय