Friday, March 29, 2024
HomeकृषीPM किसान योजना बद्दल महत्त्वाची बातमी

PM किसान योजना बद्दल महत्त्वाची बातमी

            

   नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात असलेल्या केंद्र सरकारने आता PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना आखलीय. यानुसार सध्या पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या अडीच कोटी शेतकऱ्यांना हे कर्ज देण्याचे सरकारचे नियोजन आहे. यासाठी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून खते, बियाणे आणि लॉकडाऊनमध्ये घरगुती कारणांसाठी हे कर्ज उपलब्ध होणार आहे.

या शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार रूपये विनातारण कर्ज तर ३ लाख रूपयांपर्यंतचे अल्प मुदत कर्ज हे ४ टक्के व्याजदरांने मिळणार आहे. प्रत्यक्षात या कर्जावरील व्याजदर ९ टक्के असून सरकारकडून २ टक्के व्याज अनुदान, तर वेळेवर कर्जफेड केल्यास ३ टक्के व्याजसवलत अशी एकूण ५ टक्के व्याजसवलत प्राप्त होणार आहे. चालू आर्थिक वर्षात सरकार शेतकऱ्यांना यामाध्यमातून २ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोविड -१ आर्थिक पॅकेज अंतर्गत केली आहे.

              पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) बनवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी केली गेली आहे. पीएम किसान https://pmkisan.gov.in/  पोर्टलवरील या लिंकवरून https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf  शेतकरी किसान क्रेडीट कार्डसाठी स्वतःही नोंदणी करू शकतात.

              २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना एक महत्वाची आहे. ही योजना देशातील लहान आणि सीमांत शेतकर्‍यांसाठी फायदेशीर आहे आणि पंतप्रधान-किसान म्हणून प्रसिद्ध आहे. त्याअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते. हे पैसे थेट शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. ९.१३ कोटी शेतकर्‍यांना यापूर्वीच पंतप्रधान-किसान योजनेचा लाभ मिळत आहे .

ज्यांनी नोंदणी केली नाही ते खाली दिलेल्या दुव्याद्वारे अर्ज करू शकतात;

पंतप्रधान–किसान नवीन नोंदणी

शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासनाने https://pmkisan.gov.in/ ही वेबसाइट देखील विकसित केली आहे .

           या वेबसाइटमध्ये ‘फार्मर्स कॉर्नर’ नावाचा एक विभाग आहे. ज्यामध्ये आपण या योजनेसाठी स्वत: ची नोंदणी करू शकता, आपले तपशील दुरुस्त करू शकता, देय देण्याची स्थिती आणि लाभार्थ्यांची यादी तपासू शकता. मेनू बारमध्ये तुम्हाला डाउनलोड केसीसी फॉर्म पर्याय दिसेल जिथून तुम्हाला सहजपणे किसान क्रेडिट कार्ड फॉर्म मिळू शकेल. केसीसी फॉर्म डाउनलोड केल्यानंतर ते काळजीपूर्वक भरावे लागेल आणि जवळच्या बँकेत जमा करावे लागेल. एकदा किसान क्रेडिट कार्ड तयार झाल्यावर बँक शेतकऱ्याला त्याची माहिती देईल आणि त्याच्या पत्त्यावर कार्ड पाठवेल.

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा?

* आपल्या संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – एसबीआय / एक्सिस बँक / एचडीएफसी / पीएनबी / इतर

* ‘केसीसीसाठी अर्ज करा’ ऑनलाइन शोधा आणि नंतर अर्ज डाउनलोड करा आणि मुद्रित करा

* फॉर्म योग्यरित्या भरा

* त्यानंतर बँकेच्या जवळच्या शाखेत अर्ज भरा.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय