Monday, May 6, 2024
Homeआरोग्यकोरोनानाशिक मध्ये शासन दरात उपचार होत नसेल तर रुग्णालयांची नोंदणी होणार रद्द

नाशिक मध्ये शासन दरात उपचार होत नसेल तर रुग्णालयांची नोंदणी होणार रद्द

 

नाशिक प्रतिनिधी

आज नाशिक मध्ये कोरोना संदर्भात स्थायी समितीची बैठक झाली.या बैठकीत खाजकी रुग्णालयात आर्थिक लूट होत आहे असे समोर आले. बैठकी दरम्यान कोरोना उपाय योजना करण्यात आल्या.अधिकार्‍यांत समन्वय नसल्याची गंभीर बाब समोर आली.शहरातील खाजगी रुग्णालयात सर्वसामान्यांना शासन दरात उपचार होत नसेल अशा रुग्णालयांची नोंदणी रद्द करा, असे निर्देश आज स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी प्रशासनाला दिले.गेल्या सहा महिन्यात महापालिका ऑक्सीजन प्लँट उभारु शकलो नाही, नवीन बिटको रुग्णालय पुर्ण करू शकलो नाही असे सांगत बडगुजर म्हणाले, शहरात खाजगी रुग्णालयाकडुन अरेरावी सुरू असुन रुग्णांची लुट सुरु नागरिकांना वेठीस धरण्यात येत आहे, शहरातील डबघाईस आलेल्या खाजगी रुग्णालयाने कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे.ज्या रुग्णालयात शासन दारात उपचार होणार नाही.त्यांची नोंदणी रद्द होणार.

         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत म्हणुन स्थायी समितीने औषध, साहित्य, किट व सतर खरेदीसाठी 22 ते 25 कोटी रुपयांना कार्योत्तर मंजुरी दिली. आत्तापर्यत साडेनऊ कोटी रुपये खर्च झाले. अजुनही उपाय योजना करा.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय