नाशिक : दिल्ली येथे चालू असलेल्या देशव्यापी किसान आंदोलनाला पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील जनतेने पाठिंबा दिला. सुरगाणा तालुक्यात किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डेमोक्रॅटिक युुथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या नेतृत्वखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पेठ आणि सुरगाणा तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून शासनास निवेदन देण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व इंद्रजित गावित यांनी केले. यावेळी सुरगाणा येथे मनीषा महाले, सुरेश गवळी, रामजी गावित तर पेठ येथे नामदेव मोहनकर, महेश टोपले, कमलेश बोसारे आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.