Friday, May 3, 2024
Homeग्रामीणनागपूर येथील संविधान चौकात अखिल भारतीय संघर्ष समन्वय समितीची निदर्शने

नागपूर येथील संविधान चौकात अखिल भारतीय संघर्ष समन्वय समितीची निदर्शने

 “दिल्ली मे पहुँचे किसानों, संसद की ओर कुच करो, हम तुम्हारे साथ है”  या घोषणेचा नारा

नागपूर : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने नागपूर येथील संविधान चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली.

संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याकेंद्रावर आंदोलनाचे, रास्तारोको चे आवाहन केले होते. ह्याचाच भाग म्हणून नागपूरात ही जोरदार निदर्शने करण्यात आली. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत शेतकरी लढा देत आहेत. शेतकरी विरोधी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, यावर शेतकरी ठाम आहे. 

या निदर्शनाचे प्रास्ताविक अरुण बनकर यांनी केले तर समारोप अरुण लाटकर यांनी केला. निदर्शनात शेतकरी नेते विजय जावनधिया, दक्षिणायन च्या अरुणा सबाने, बिजोत्सव च्या अरुणा पावडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वंदना वनकर, इंडियन असोसिएशन ऑफ लॉयरच्या ऍड. अनिल काळे, विदर्भ माध्यमिक संघाचे विठ्ठल जुनघरे, आयटकचे कॉ. श्याम काळे, सिटुचे कॉ. मधुकर भरणे, प्रीती पराते, टीयुसीसीचे मारुती वानखेडे, एसयुसीआयचे माधव भोंडे, शेतमजूर युनियनच्या अंजली तिरपुडे, मदन भगत, मनोहर मुळे, अखिल भारतीय किसान सभेचे अरुण लाटकर, अशोक आत्राम, अमोल धुर्वे, जय जवान जय किसानचे अभिनव फिटिंग, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अरुण बनकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय