एकाच दिवसात केले 5 हैंडपंप दुरूस्त
धुळे : नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत धुळे जिल्हा बिरसा क्रांती दलाचे महासचिव विलास पावरा हे शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा ग्राम पंचायतित नव्यानेच निवडून आले.
इंजिनियरींग विद्याशाखेत विद्यापीठात गोल्ड मेडलिस्ट असलेले विलास पावरा यांनी लागलीच कामाचा धडाका सुरू केला. गावात एकूण 6 हैंडपंप मागील कित्येक वर्षांपासून नादुरूस्त होते. ते पावरा यांनी दुरूस्त करूवून घेतले.
उच्चशिक्षित असलेल्या विलास पावरा यांनी दैनंदिन समस्या सोडवण्यामुळे मागील पाच वर्षांत जमले नाही. ते केवळ एकच दिवसात करून दाखवले. अशी जोरदार चर्चा आता गावातील लोक करु लागले आहेत.
यावेळी शिरपूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष (ग्रामीण) गेंद्या पावरा, भाईदास पावरा, माजी उपसरपंच सुभाराम पावरा, रोजगार सेवक चंपालाल पावरा, वांगऱ्या पावरा, लेदला पावरा, राजेश पावरा, भुऱ्या पावरा हे उपस्थित होते.
नव्या क्रांतीची सुरुवात…!
जामण्यापाडा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विलास पावरा यांनी गावातील हातपंप दुरूस्ती करून द्यावे याकरिता गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे दि. 30 जानेवारी 2021 रोजी निवेदन दिले होते, आणि आज शासनाने दखल घेऊन हातपंप दुरूस्ती करून देण्यात आले. एकीकडे सरपंच पद कोण मिळवणार? याकडे सर्वांचे लक्ष असताना गावातील खरा समाजसेवक मात्र गावातील समस्यांनाच प्राधान्य देतोय. त्यामुळे खरा समाजकारक हे लोकांना चांगलेच ठाऊक आहे.