Friday, May 17, 2024
Homeराज्य'बिपरजॉय' चक्रीवादळ तीव्र; तब्बल 'इतक्या' प्रति तासाने वारे वाहण्याची शक्यता

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ तीव्र; तब्बल ‘इतक्या’ प्रति तासाने वारे वाहण्याची शक्यता

Biperjoy Cyclone : येत्या 24 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात गोव्याच्या पश्चिमेस 700 किलोमीटर अंतरावर आणि मुंबईच्या नैऋत्येस 630 किलोमीटर अंतरावर बिपरजॉय हे चक्रीवादळ स्थिरावलेलं आहे. आता हे वादळ हळूहळू उत्तरेकडे सरकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

तर पुढील काही तासांत हे वादळ तीव्र होणार आहे. या वादळामुळे वारे 125 किलोमीटर ते 150 किलोमीटर प्रती तास वेगाने वाहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर त्याचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई, कोकण किनारपट्टीला वादळाचा धोका नसला तरी समुद्राच्या अंतरंगात बदल होणार आहे. यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील समुद्र खवळलेला असल्याचा पाहायला मिळत आहे. उंच लाटा देखील समुद्रातून बाहेर पडत आहेत.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : CET चा निकाल लागला ! असा चेक करा

आळंदीत लाठीचार्ज झाला नसून केवळ बाचाबाची – गृहमंत्री फडणवीस

ब्रेकिंग व्हिडिओ : आळंदीत पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज

ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी

बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन

नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल रमेश बैस

आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, अशा असणार सोयी-सुविधा

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय