Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महिला शहराध्यक्ष मंदाताई संजय बनसोडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर – दि.८
संपादिका आभा न्यूज तसेच साप्ताहिक पालिका संदेश संपादिका व प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मंदा बनसोडे यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य लातूर यांच्या वतीने पत्रकारितेतील राज्य महिला पदाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा गुरूवार दिनांक ८ जून,२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृह, लातूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखदारपणे पार पडला.



यावेळी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कार्याचा गौरव करीत पुरस्कारप्राप्त मान्यवरांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एल सी बी चे पी आय गजानन भातलोंढे, जे जे हॉस्पिटलचे माजी व्हॉईस डीन डॉ. विनायकराव पाटील यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे तर प्रमुख उपस्थितीत संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राज्य महिला अध्यक्षा डॉ.सुधा कांबळे, राज्य उपाध्यक्ष विशाल पवार, पंकज वानखेडे, अजय सुर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, संघटक बापू गायकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली पाटील, जिल्हा संघटक संजय राजूळे, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारितेतील मला मिळालेला राज्य महिला पदाधिकारी पुरस्कार हे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडचे यश हे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगाव यांच्या मार्गदर्शनामुळे व संघावर ठेवलेला विश्वास व कार्याचे यश आहे, असे मंदा बनसोडे म्हणाल्या.कोणत्याही संघाचे कर्तुत्व हे त्याच्या सदस्य संख्येवर अवलंबून नसून त्यांनी केलेले वेळोवेळी सामाजिक ,राजकीय व सर्व क्षेत्रातील योगदान, कार्य यांच्यावर अवलंबून असते.

हे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड यांनी हे सिद्ध केले आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच हा पुरस्कार माझ्या एकटी चे श्रेय नसून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष उषा लोखंडे, सचिव निर्मला जोगदंड, तसेच संघाचे पदाधिकारी सदस्य यांनी दिलेला सहभाग सहकार्यामुळे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्तीचे यश शक्य झाले, असे त्यांनी सांगितले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या कौतुकास्पद कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

ब्रेकिंग व्हिडिओ : आळंदीत पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज

पुण्यातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी भारताला मिळाले अकरा सुवर्णपदक

स्पाईन रोड : जागरूक नागरिकाच्या तत्परतेमुळे प्रशासनाने मोठा खड्डा बुजवला

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय