Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडस्पाईन रोड : जागरूक नागरिकाच्या तत्परतेमुळे प्रशासनाने मोठा खड्डा बुजवला

स्पाईन रोड : जागरूक नागरिकाच्या तत्परतेमुळे प्रशासनाने मोठा खड्डा बुजवला

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चिखली स्पाईन रोड गुंजकर हॉस्पिटलच्या जवळ काही महिन्यांपूर्वी स्टॉर्म वॉटर पाईपलाईन टाकण्यासाठी या प्रशस्त वर्दळीच्या रस्त्याची खोदाई केली होती. त्यानंतर त्या ठिकाणी पूर्वरत डांबरीकरण संबंधित ठेकेदाराने केले नव्हते. दरम्यानच्या काळात येथे वेगवान वाहने घसरून चार अपघात झाले होते.



महात्मा फुले नगर, चिंचवड येथील जेष्ठ नागरिक यशवंत कण्हेरे यांनी सदरच्या रस्त्यावरील धोकादायक स्थिती स्थापत्य विभागाच्या भसारकर यांना व्हिडिओ कॉल करून दाखवली, त्यानंतर मनपाच्या वतीने तातडीने खोदलेल्या व खड्डा पडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले.

शहरात विकासकामे केल्यानंतर रस्त्याची सुरक्षितता न बघता ठेकेदार कामे करून निघून जातात. जागरूक नागरिकांनी प्रशासनास वेळेत माहिती करून दिली तर संबंधित विभाग तातडीने काम करतो.असे यशवंत कण्हेरे यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय