Saturday, May 4, 2024
Homeक्राईमविवाहित पुजाऱ्याने केली प्रेयसीची हत्या; मग जे केले ते पाहून सर्वच हादरले...

विवाहित पुजाऱ्याने केली प्रेयसीची हत्या; मग जे केले ते पाहून सर्वच हादरले !

हैदराबाद : प्रेयसी वारंवार लग्नाचा तगादा लावत असल्याने एका पुजाऱ्याने तिची हत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह मॅनहोलमध्ये टाकण्यात आला होता.

पोलिसांना मॅनहोलमधून मुलीचा मृतदेह सापडला आहे. खून करून तरुणीचा मृतदेह मॅनहोलमध्ये फेकल्याचा पुजाऱ्यावर आरोप आहे. व्यंकट साईकृष्ण असे आरोपीचे नाव आहे. तो बंगारू मैसम मंदिरात पुजारी आहे. अप्सरा असे मृत तरुणीचे नाव आहे. ही तरुणी सरूर नगर भागात आईसोबत राहायची.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्सरा अनेकदा मंदिरात असताना तिची आई साई कृष्णशी ओळख झाली. ओळखीमुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने पुजारी साई कृष्ण अनेकदा अप्सराच्या घरी जात असे. अप्सराने लग्नासाठी पुजारीवर दबाव टाकला. मात्र, तीन मुलांचा पिता असलेल्या आरोपीने लग्नास नकार दिला.

अप्सरा प्रायव्हेट कंपनीत नोकरी करायची. पुजारी म्हणून काम करणारा साई कृष्ण हा शरूरनगर परिसरात राहत होता. पोलिसांनी सांगितले की, नारकुडा गावात राहणारी 30 वर्षीय अप्सरा एका खासगी कंपनीत काम करायची. पोलिसांनी सांगितले की, अप्सरा साई कृष्णासोबत सुल्तानपल्ली येथील गोशाळेत गेली आणि तिथे कृष्णाने तिची हत्या केली.

गुन्हा लपवण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी पुजाऱ्याने 4 रोजी अप्सराचा मृतदेह सरूरनगर विभागीय कार्यालयाजवळील मॅनहोलमध्ये फेकून दिला. खून केल्यानंतर व्यंकट साईकृष्णने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगळाच प्लॅन आखला. त्याने स्वत: अप्सरा बेपत्ता झाल्याची शमशाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दोघांचे कॉल डिटेल्स तपासल्यांतर त्यांना तक्रारदार देणाराच आरोपी असल्याचे समजले. पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्हीही तपासले असता दोघेही एका कारमधून जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ खून प्रकरणात साई कृष्णाला अटक करून चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा :

‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता’, चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी नाही…

‘मुख्य सल्लागार’ म्हणूनची आमची नावे काढा; सुहास पळशीकर, योगेंद्र यादव यांचे NCERT ला पत्र ? वाचा सविस्तर!

‘ह्याच्यावर संस्कार झाले आहेत… फक्त नथूरामाचे’, जितेंद्र आव्हाडांचा फोटो शेअर करत भाजपावर निशाणा

‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना’ आहे तरी काय ? वाचा !

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ – केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

शरद पवार यांना धमकी देणाऱ्याचे या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल, धमकी देणारा कोणत्या पक्षाचा ?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय