Monday, July 8, 2024
Homeजिल्हाकिसान सभेच्या लढ्याला मोठे यश; डेहने या आदिवासी भागात 108 ची रुग्णवाहिका...

किसान सभेच्या लढ्याला मोठे यश; डेहने या आदिवासी भागात 108 ची रुग्णवाहिका व हिरडा खरेदी केंद्र सुरु

पुणे : खेड तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात रुग्णवाहिका नसल्यामुळे, गर्भवती महिलांना,आपला जीव गमावा लागला होता. तर काही वेळा गर्भवती महिलांच्या बाळाचा जीवही गमवावा लागला होता. तसेच सर्पदंश झालेले अनेक सामान्य माणसे यांना, योग्यवेळी रुग्णवाहिकां उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना खाजगी गाड्यांच्या प्रवासामध्ये व अपुऱ्या सुविधांमुळे अर्ध्या रस्त्यातच आपले प्राण गमवावे लागले होते. (Kisan Sabha)

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभा (Kisan Sabha) पुणे जिल्हा समिती यांनी मागील काही महिन्यापासून खेड तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागामध्ये 108 ची रुग्णवाहिकां सेवा उपलब्ध व्हावी यासाठी लोकशाही मार्गाने आपला लढा सतत सुरु ठेवला होता. अशाच प्रकारची मागणी या भागातील काही लोकप्रतिनिधी व कल्पवृक्ष सारख्या सामाजिक संस्था यांनी ही या अगोदर केली होती.

किसान सभेने आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनानंतर ही मागणी मान्य करण्यात आली होती. नुकतेच ही रुग्णवाहीकां डेहने येथे दाखल झाली आहे रुग्णवाहिकेचे कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम किसान सभेच्या वतीने डेहने येथे पार पडला. यावेळी या गाडीचे अनोपचारिक उदघाटन ही करण्यात आले.

तसेच, खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील, हिरडा उत्पादकांच्या हिरड्याची खरेदी महाराष्ट्र शासनाने करावी यासाठीही किसान सभेने संघर्ष उभा केला होता. किसान सभेच्या या संघर्षाला यश मिळाले व आदिवासी विकास विभागाने पुन्हा बाळ हिरडा खरेदी करणं चालू केलं असून बाळ हिरड्याला 170 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. या हिरडा खरेदी केंद्राचे ही उद्घाटन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय किसान सभा, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल वनघरे, श्रीमती निकम मॅडम, दूध उत्पादक संघाचे चेअरमन लक्ष्मण शेठ तिटकारे, सुरेश कशाळे, गेनभाऊ वाजे, तुकाराम भोकटे गुरुजी, अशोक पेकारी, अशोक जोशी, अमोद गरुड, विकास भाईक, मारुती शिंदे, सखाराम जोशी, ज्ञानेश्वर भाईक, गीताराम डवणे, नवनाथ मोरे इत्यादी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत

ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय