Sunday, April 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा दिलासा, LPG सिलिंडरचे जाणून घ्या नवे दर

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा दिलासा, LPG सिलिंडरचे जाणून घ्या नवे दर

पुणे : आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या गॅस दरात तब्बल 92 रुपयांची कपात करण्यात आलीय. फक्त व्यावसायिक गॅस सिलंडरच्या दरात बदल करण्यात आला आहे.आज 1 एप्रिल असून आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला जनतेला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आजपासून LPG गॅस सिलिंडरच्या किमती 91.50 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत.घरगुती 14.2 किलो ग्रॅम सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारने मार्च महिन्यात व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात 350 रुपयांची वाढ केली होती. आता दर 92 रुपयांनी कमी केले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅस 19 किलोग्रॅम वजनाचा असतो.

दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस २०४८ रुपयांवर, तर कोलकात्यात २१३२ रुपयांमध्ये विकला जात आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचे दर १९८० रुपये आणि चेन्नईत २१९२.५० रुपये इतके झाले आहेत. घरगुती गॅसच्या किंमती गेल्या महिन्यापासून जैसे थे आहेत. दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडर ११०३, तर मुंबईत १११२.५ रुपये इतक्या दराने विक्री होत आहे.

चेन्नईत याचा दर १११८.५ रुपये तर कोलकात्यात ११२९ रुपये इतका आहे. घरगुती गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी दरांची समीक्षा करतात. गेल्या महिन्यात घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ केली होती. व्यावसायिक एलपीजी दरांमध्ये ९१.५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. यावेळी करण्यात आलेली कपात ही सर्वाधिक आहेत. मुंबई आणि दिल्लीत ही कपात आहे. तर कोलकात्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात ८९.५० रुपये तर चेन्नईत ७५.५ रुपयांची कपात करण्यात आलीय.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय