Friday, March 29, 2024
Homeराष्ट्रीयअमूल दुध लिटरमागे दोन रुपये महागणार, आजपासून लागू होणार "हे" नवे दर

अमूल दुध लिटरमागे दोन रुपये महागणार, आजपासून लागू होणार “हे” नवे दर

पुणे : संपूर्ण भारतीयांच्या गळ्यातील ताईत असणारे अमूल दूध दोन रुपयांनी महागणार आहे.याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होणार आहे. अमूलने सहा महिन्यांत दुसऱ्यांदा दुधाच्या दरात वाढ केली आहे.

वृत्तानुसार, नवीन किंमती आजपासून लागू होणार आहेत. आता नवीन किंमतींनुसार, अमूल गोल्ड 64 रुपये, अमूल शक्ती 58 रुपये आणि अमूल फ्रेश 52 रुपये प्रति लिटर दराने विकले जाईल. यासोबतच म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जी आता 34 रुपये प्रति 500 ​​मिली दराने विकली जाईल.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय