मुंबई : बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra bandh) हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या बंदला बेकायदेशीर ठरवले आहे. कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बंद केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते आणि इतरांनी महाराष्ट्र बंदविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली. सदावर्ते यांनी यावेळी आक्रमक युक्तिवाद करत, “सदर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आणि सरकारने या प्रकरणाची SIT स्थापन केली आहे, मग महाराष्ट्र बंद कशासाठी?” असा सवाल केला. यानंतर न्यायालयाने महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला बेकायदेशीर घोषित केले.
Maharashtra bandh वर मविआच्या नेत्यांची भुमिका
बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या भयंकर अत्याचारासारख्या घटना मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात घडत असल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या 24 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबई उच्च न्यायालयाने ‘बंदी’ घातली असली तरी आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. न्यायालयाचा निकाल मान्य नाही, पण न्यायालयाचा आपण आदर राखतो असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, या आंदोलनात मी स्वतः 11 वाजल्यापासून शिवसेना भवनासमोरील चौकात आंदोलनाला बसणार आहेत. शिवाय मुंबईसह राज्यभरात गावागावात आणि चौकाचौकात तोंडाला काळी पट्टी आणि हातात काळे झेंडे घेऊन जनतेकडून उत्स्फूर्तपणे ‘तोंड बंद आंदोलन’ केले जाणार आहे.
बदलापूरमध्ये दोन चिमुरडींवर झालेला अत्याचार अतिशय घृणास्पद होता. त्यामुळेच समाजाच्या सर्व स्तरातून याचा निषेध करण्यात येत आहे. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बंदची हाक दिली होती. मात्र न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून बंद मागे घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात तातडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घेण्यात येत असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘एक्स’वर जाहीर केले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून आम्ही बंद मागे घेत आहोत. काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व नेते आणि राज्यातील सर्व कार्यकर्ते सर्व जिह्यांत तोंडाला काळ्या पट्टय़ा आणि हातात काळे झेंडे घेऊन महिलाविरोधी महायुती सरकारचा निषेध करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. मी स्वतः सकाळी 11 वाजता ठाणे येथे या आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात सूचना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात दिल्या आहेत. आम्ही बंद करणार नाही, मात्र जनतेने बंद केल्यास संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
मोठी बातमी : महाराष्ट्र बंदला न्यायालयाकडून ब्रेक, महाविकास आघाडी निषेध नोंदवणार
शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा, पवारांनी व्यक्त केली शंका
Accident : नेपाळ बस अपघात, ४० भारतीय प्रवाशांना जलसमाधी, १४ ठार
धक्कादायक : बदलापुरनंतर कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून
MPSC : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश
मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार